Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे.
Published on

राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हणत घरोघरी गणपती बाप्पाचं आज आगमन होईल.

राज्यभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी रांगाच - रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहे. यंदा कोणतेही बंधन नसल्याने भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. यंदा लालबागचा राजाचा दरबार हा मयूर महालात आहे.

यंदाचं लालबागच्या राजाचं हे 91 वं वर्ष आहे. आज पहाटे लालबागच्या राजाची पारंपारिक विधिवत पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com